पुणे : शहरातील पुलगेट डेपोमध्ये आज सकाळी सीएनजी बसला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तात्काळ ही आग विझवण्यात आली.
पुणे कॅम्प परिसरातील पुलगेट बस डेपोमध्ये आज सकाळी 5 वाजून 45 मिनीटांनी अचानक एका सीएनजी बसला आग लागली. दरम्यान, तिथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलातील जवानांनी त्वरित आग विझवली. या कामगिरीमध्ये वाहक इम्रान तांबोळी,तांडेल, विकास खराडे, फायरमान कुंडलिक गायकवाड, विशाल दगडे, नवनाथ चव्हाण, दिनेश शिंदे यांनी ही आग आटोक्यात आणली.