पंतप्रधानांच्या नावे व्हीआयपी सेवा लाटणाऱ्या फसव्या अध्यात्मिक गुरूंना अटक!

नवी दिल्ली – दिल्ली पोलीसांनी पुलकित महाराज उर्फ पुलकित मिश्रा याला अटक केली आहे. पुलकित महाराज हा पंतप्रधानाचा अध्यात्मिक गुरू आहे असे सांगून वेगवेगळ्या राज्यात सुरक्षा आणि व्हीआयपी प्रोटोकाॅलची (सेवा) ची मागणी करत असत. दिल्ली पोलीसांनी पीएमअो (पंतप्रधान कार्यालय) मधून मिळालेल्या तक्रारीनंतर पुलकित महाराजविरोधात आॅगस्टमध्ये केस दाखल केली होती.

पंतप्रधान कार्यालयातील असिस्टेंट डायरेक्टर यांनी पुलकित महाराज विरोधात  केस केली होती. पंतप्रधानाजवळ हे प्रकरण सीतापूरचे डीएम यांच्या तक्रारीनंतर पोहचले होते. सीतापूर के डीएम यांना एका व्यक्तीने पत्र लिहित पुलकित महाराज यांची राहण्याची सोय आणि सुरक्षिततेची व्यवस्था करण्यास सांगितले होते. डीएम यांना त्या व्यक्तीने सांगितले होते की, तो कला आणि सांस्कृतिक मंत्रालयाचा सचिव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुलकित महाराज याचे अनेक व्हीआयपी लोकांसबोत फोटो आहेत. स्वतला राष्ट्रपतीकडून सन्मानित करण्यात आले असे सांगून व्हीआयपी प्रोटोकाॅलच्या सोयी-सुविधा पुलकित महाराज घेत होता.

पुलकित महाराज कोण आहे

पुलकित हा स्वतला आध्यात्मिक गुरू सांगत असे. एवढच नाही तर महाराजाने दावा केला आहे की  तो  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आध्यात्मिक गुरू आहे आणि त्याने अनेकवेळा त्यांची मदत केली आहे. तसेच त्याला त्याच्या लग्नाच्या तीन महिन्यानंतर पीएमअो कार्यालयातर्फे कला संस्कृति मंत्रालयाचा सचिव बनविले आहे. असे सांगून ते महाराज अनेक राज्यात सुरक्षेची आणि सुविधेची मागणी करत असत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)