पुजाराला गोलंदाजी करणे कठीण – कमिन्स

मेलबर्न – भारतीय क्रिकेट संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजारा याला गोलंदाजी करणे खरेच खूप कठीण असते. अन्य फलंदाजांना गोलंदाजी करणे आणि पुजाराला गोलंदाजी करणे यात खूप फरक आहे, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने पुजाराचे कौतुक केले आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) आयोजित केलेल्या एका मुलाखतीत कमिन्सने भारतीय संघातील अनेक दिग्गज फलंदाजांबाबत आपली मते मांडली. मात्र, पुजाराच्या तंत्राचे कौतुक करताना त्याचा खेळपट्टीवर उभे राहण्याचा संयम अनेकांना भावतो. दोन वर्षांपूर्वी भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियावर मालिका विजय मिळविला होता, त्यात पुजाराने संपूर्ण मालिकेत वर्चस्व राखले होते. त्या मालिकेत पुजाराने 3 शतके व 1 अर्धशतक फटकावताना सर्वाधिक 521 धावा केल्या होत्या. टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा झाल्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच राहणार असून त्यावेळी एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेत पुजारा हाच लक्ष्य असेल, असेही कमिन्सने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.