जगनमोहन आणि केसीआर मोदींचे पाळीव कुत्रे- एन. चंद्राबाबू नायडू

मचिलीपटनम – लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून नाराज उमेदवारांच्या पक्षातील एन्ट्री आणि एक्झिटचे सत्रच सध्या अवघ्या देशामध्ये पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रचारा दरम्यान आपल्या वादग्रस्त विधानामुळे काही नेते चर्चेत आले आहेत. अशातच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि टीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त विधान केले आहे.

मचिलीपटनम येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एन. चंद्राबाबू म्हणाले, “जगनमोहन रेड्डी कुत्र्याची बिस्किटे खात आहेत. तिच बिस्किटे आपल्याला वाटत आहेत. जगनमोहन आणि केसीआर मोदींचे पाळीव कुत्रे आहेत, जे एका बिस्किटासाठी आपले गुडघे टेकून बसतील. सावध राहा, जगनमोहन हे बिस्किट तुम्हाला सुद्धा देण्याचा प्रयत्न करतील.”

Leave A Reply

Your email address will not be published.