हडपसर – शिवसेना उपशहर प्रमुख समीरआण्णा तुपे यांच्या सन 2022 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन विधान परिषेदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम मध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजित “आदित्य पदाधिकारी संवाद” या कार्यक्रमादरम्यान तुपे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर ,सहसंपर्क प्रमुख पुणे ज़िल्हा आदित्य शिरोडकर , ज़िल्हाप्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीरआण्णा तुपे,नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर,विधानसभा समन्वयक तानाजी लोणकर, विभाग प्रमुख सुरज कांबळे,शाखा प्रमुख अमित कांबळे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
गेली पाच वर्षांपासून दिनदर्शिका काढण्यात येत असून या भागात त्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना चांगला फायदा होतो, असे समीर तुपे यांनी सांगितले.