नागरिकांना हक्काची जाणीव करुन देण्याचे काम ॲड. आळंदीकरांनी केले – न्यायाधीश भालेराव

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) – कायद्याचे ईतक्या सोप्या भाषेत पुस्तक तयार करणे हे मोठे आव्हान असते, मात्र बारामतीतील वकील आळंदीकर यांनी ते लिलया पेलले. एकीकडे ओला दुष्काळ तर दुसरीकडे सुका दुष्काळ अशी परिस्थीती असताना विचारांचा दुष्काळ देखील जाणवत आहे. मात्र ॲड. आळंदीकर यांनी सर्वसामान्य लोकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करुन दिल्याने विचारांच्या दुष्काळावर मात झाली आहे. आळंदीकर यांच्या पुस्तकाचा सामान्य जनतेबरोबर नवोदित वकिलांनाही फायदा होईल, असे मत जिल्हा न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी व्यक्त केले.

वकील ॲड. गणेश आळंदीकर यांनी लिहिलेल्या ‘दैनंदीन जीवनातील कायदे’ (नवनवीन दुरुस्त्या सह )या सोप्या मराठी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे मा. अध्यक्ष ॲड डॉ.सुधाकर आव्हाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी येथील सर्व न्यायाधीश, वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड. ज्ञानदेव रासकर, जेष्ठ विधीज्ञ ए. व्ही. प्रभुणे, ॲड नीलिमा गुजर, डॉ अतुल शहाणे इत्यादी मान्यवर हजर होते .

मुख्य जिल्हा न्यायाधीश आर. बी. देशपांडे यानी हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे महत्वपुर्ण असुन नवोदित वकील व विधी च्या विद्यार्थ्यांना तर उपयोगी आहेच, मात्र याची भाषा सोपी असल्याने ते सर्वसामान्य नागरिकांनाही उपयोगी ठरेल असे मत व्यक्त केले .

ॲड. सुधाकर आव्हाड म्हणाले, कि कायद्याचे पुस्तक करताना अतिशय बारकावे पहावे लागतात, मात्र ॲड. आळंदीकर यांच्या अभ्यासु वृत्तीने ते सहजपणे पार पाडले. कायद्यातील नवनवीन बदलांचा अभ्यास करून समाजात ज्ञान वाटण्याचे पवित्र काम या पुस्तकाद्वारे होईल असे सांगुन भारतातील प्रसिद्ध हिंद लॉ बुक ने हे पुस्तक छापून आळंदीकर यांच्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरणार असून भविष्यात असेच दर्जेदार लेखन त्यांच्या हातुन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ॲड. आळंदीकर यांनी प्रास्ताविकमध्ये ‘कायद्याची क्लिष्ट भाषा व १००/२०० पानी निकालपत्रे वाचणे हे सर्वसामान्य जनतेला अशक्य असते’ म्हणुन कमी शब्दात सोप्या भाषेत हे पुस्तक बदलत्या कायद्याची माहिती देणारे बारामतीतील वकिलाद्वारे लिहिले गेलेले कायद्याचे पहिले पुस्तक असल्याचे सांगितले आहे.

ॲड. ए. व्ही प्रभुणे यांनीही मनोगत व्यक्त केले. वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. ज्ञानदेव रासकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर ॲड श्रीकांत काटे यांनी सुत्रसंचालन केले. ॲड. मनिष गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी बारामती सह सोमेश्वरनगर मधील पत्रकार बांधव उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.