माऊंटन-मेन शेर्पा पुस्तकाचे नेपाळमध्ये प्रकाशन

पुण्याच्या उमेश झिरपे लिखित पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही प्रकाशित

पुणे – शेर्पा समाज जीवनावर व विविध दिग्गज शेर्पांच्या जीवनकथेवर प्रकाश टाकणाऱ्या पर्वतपुत्र शेर्पा या मराठी पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादीत माऊंटन- मेन शेर्पा आवृत्तीचे नेपाळची राजधानी काठमांडू येथे प्रकाशन करण्यात आले. शेर्पा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत हे पुस्तक शेर्पा समाजाला समर्पित करण्यात आले. उमेश झिरपे लिखित या पुस्तकाचा विवेक शिवदे यांनी केलेला अनुवाद आहे.

आंतरराष्ट्रीय बुद्ध संघटनेचे अध्यक्ष एच. एच. फुपू छेम्बे शेर्पा थुप्टिन जिकडोल, टीएएएनचे अध्यक्ष खुम सुबेडी तसेच आंग दावा शेर्पा यांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा पार पडला. शेर्पा पत्रकार संघ यांच्या वतीने व पिक प्रमोशन प्रा. ली.चे संचालक आंग बाबू शेर्पा यांच्या देखरेखीमध्ये या सोहळ्याचे काठमांडू येथील संपदा सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते.

2019 साली पुण्यात उमेश झिरपे यांच्या पर्वतपुत्र शेर्पा या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. शेर्पा समाजावर भाष्य करणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे. या पुस्तकाला गेल्या वर्षभरात उदंड प्रतिसाद मिळाला. शेर्पांची कामगिरी जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित करण्यात आला. कांचनजुंगा शिखरवीर व अनुभवी गिर्यारोहक विवेक शिवदे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला असून रोहन प्रिंट्‌स यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.