नेवासा : सार्वजनिक बांधकाम विभागाने नेवासा शहरातील अतिक्रमणे मोठ्या चोख पोलीस बंदोबस्तामध्ये सोमवार (दि.३) रोजी भुईसपाट केली. सोमवारी सकाळपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाने ही अतिक्रमण मोहिम हाती घेत शहरातील नेवासा फाटा – श्रीरामपूर रोडवरील असलेली अतिक्रमणातील पक्के बांधकाम असलेली ही दुकाने या अतिक्रमण मोहिमेत भुईसपाट करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केलेल्या या अतिक्रमण मोहीमध्ये दंगल नियंत्रण पथक,नेवासा पोलीस आणि होमगार्डस असे एकुण ८० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या अतिक्रमण मोहिमेत सहभाग नोंदवून चोख बंदोबस्त ठेवत ही मोहीम फत्ते केली. नेवासा शहराच्या रस्त्यावरील ही अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने भुईसपाट केल्यामुळे नेवासा शहराचा कोंडलेला श्वास अखेर मोकळा झालेला आहे. मात्र या व्यावसायावर उदरर्निवाह असलेल्या कुटूंबावर मात्र या अतिक्रमण मोहिमेमुळे संक्रात कोसळली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केलेल्या या अतिक्रमण मोहीमेत सर्वांना समान न्याय देवून नियमाप्रमाणे अतिक्रमण मोहीम राबवाबी असे आवाहन सर्वसामान्य भुईसपाट झालेल्या अतिक्रमणधारकांनी यावेळी बोलताना केले. आमची दुकाने भूईसपाट झालेले असताना बड्या धेंडांच्याही मापात पाप करुन आमच्यावर अन्याय नको? अशी आर्त हाकही यावेळी छोट्या व्यावसायिकांनी दैनिक प्रभात’शी बोलताना दिली.
नेवासा शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केलेल्या या अतिक्रमण मोहिमेत पोकलँण्ड आणि जेसीबी सहाय्याच्या यंञाणे ही अतिक्रमणे क्षणार्धात एक – एक अतिक्रमणे नष्ट करत डंपरच्या सहाय्याने रस्त्यावर पडणारे पत्रे- अँगल आणि साहित्याची रवानगी करण्यात आली. ही अतिक्रमण मोहीम दिवसभर राबविली गेलेली असून आणखी दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणे गरज वाटल्यास ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आलेली आहे.
आमची दुकाणे भुईसपाट झाली…आता इतरांनाही मापात पाप नको!
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमणे मोहीमेत हातावर पोट असणाऱ्यांची अतिक्रमणे भुईसपाट झाल्यामुळे आता पुन्हा पक्के बांधकाम असणाऱ्या बड्या धेंडांना मापात पाप करु नका अशी मागणीही यावेळी छोट्या व्यावसायिकांनी यावेळी बोलताना केली.