शिरुर | वाघोली मध्ये अजित दादा पवार राष्ट्रवादी गटाचे माजी जिल्हाध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक शांताराम बापू कटके यांनी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अशोकबापू पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
वाघोलीमधील माजी उपसरपंच ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कमलाकरदादा सातव पाटील,माजी उपसरपंच राजेंद्र आण्णा सातव पाटील, माजी सरपंच शिवदास उबाळे,माजी सरपंच वसुंधराताई उबाळे,माजी सरपंच जयश्रीताई सातव ,माजी उपसरपंच संजय आप्पा सातव पाटील, माजी उपसरपंच कैलास बापू सातव पाटील, रामेश्वर शास्त्री प्रसादिक दिंडी माजी अध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, शिवसेना नेते राजेंद्र पायगुडे, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख युवराज शेठ दळवी,युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव विशालजी सातव पाटील,
ओबीसी सेलचे अध्यक्ष संदीपजी थोरात, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब हरगुडे, सावता माळी ट्रस्ट चे अध्यक्ष विठ्ठल भाऊ शिवरकर,रामेश्वर शास्त्री प्रसादिक दिंडी मंडळाचे सचिव संतोष सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते किसन महाराज जाधव ,बाळासाहेब शिंदे, अतुलजी शिंदे, सचिन काळे,गणेश तांबे, गणेश पवार, ओंकार तुपे ,पप्पू शेठ लोले, शिवरत्न बानगुडे, वाघोली गावातील ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शांताराम कटके यांनी उमेदवारीचा अर्ज माघारी घेतल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मी अनेक वर्षापासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. अजित पवार यांच्या विचारांचा सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रसार आणि प्रचार गेल्या अनेक वर्षापासुन मी करत आहे.
राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत जे इच्छुक उमेदवार होते. त्यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा होती. परंतु पक्षाचा कुठलाही काडीमात्र संबंध नसलेला, अजित पवार यांच्या विचारांची कास नसलेला उमेदवार आयात केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणुन मला खंत वाटली. एवढ्या दिवस राष्ट्रवादी पक्षाचा एकनिष्ठ तसेच कुठल्याही परिस्थितीत अजित पवारांची पाठ न सोडणारा मी कार्यकर्ता असताना सुद्धा माझी योग्यता पक्षाला समजली नाही याची खंत वाटते. शांताराम कटके कोण आहे हे दाखवून देवू..
-शांताराम कटके
समता पार्टी सैनिक संघटनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब बाळासाहेब जाधव (माजी सैनिक) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे