मुंबई – कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेबांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार चंद्रकांत पाटल यांनी केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांवर वादग्रस्त विधान करीत असतात. त्यातच आता चंद्रकांत पाटलांच्या विधानाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपमधील आणखी एका वाचाळविराने मुक्ताफळे उधळली.कर्मवीर भाऊराव पाटील, म.फुले , बाबासाहेबानी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करुन महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व महापुरुषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलाचा जाहीर निषेध. pic.twitter.com/ERp4XZy2lu
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 9, 2022
यावर आता राष्टवादी काँग्रेस नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, ‘भाजपमधील आणखी एका वाचाळविराने मुक्ताफळे उधळली.कर्मवीर भाऊराव पाटील, म.फुले , बाबासाहेबानी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करुन महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व महापुरुषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलाचा जाहीर निषेध..’ असेही ते म्हणाले आहे.