पंकजा मुंडेंकडून शरद पवारांचं जाहीर कौतुक; म्हणाल्या, “हॅट्स ऑफ…”

पुणे – ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विट खात्यावरून, ‘पवारसाहेब हॅट्स ऑफ… आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले,’ असा संदेश पोस्ट करत शरद पवारांचे कौतुक केले आहे.

ट्विटमध्ये पंकजा मुंडे यांनी, ‘शद पवार यांनी कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील अनेक शहरांना भेटी देऊन तेथील उपाययोजनांची पाहणी केली. याचाही उल्लेख करत कोरोनाच्या काळात इतका सगळा दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले,’ अशा शब्दांमध्ये शरद पवार यांच्या कामाचा आदर केला.

यासोबतच त्यांनी, ‘पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,’ असं म्हणत मुंडे साहेबांनी दिलेल्या शिकवणीचाही आवर्जून उल्लेख केला.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

या बैठकीबाबत माहिती देताना पंकजा मुंडे यांनी, “शरद पवार hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे. या बैठकीस ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते”

“तसेच ऊसतोड कामगारांची नोंदणी, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थसहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, कामगार महिलांसाठी आरोग्य योजना, कामगारांसाठी विमा योजना, यांसह विविध बाबींवर देखील यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.” अशी माहिती दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.