नांदेडच्या पीएसआयने केली पुण्यातील शिपाई महिलेची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवत 5 लाख रुपये, 9 तोळे दागिनेही घेतले

पुणे  – नांदेड पोलीस दलातील उपनिरीक्षकाने पुण्यातील एका महिला शिपायाला लग्न करण्याचे आमिष दाखवत जवळीक साधली. तर कर्ज असल्याचे सांगून 5 लाख रुपये आणि 9 तोळे दागिने घेऊन ते परत न करता फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 

याप्रकरणी उपनिरीक्षक रहीम बशीर चौधरी (वय 30, रा. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी महिला शिपायाच्या तक्रारीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला शिपाई पुणे पोलीस दलात नोकरीस आहे. तर उपनिरीक्षक रहीम हा पूर्वी पोलीस कॉन्स्टेबल होता.

 

खात्याअंतर्गत परीक्षेत तो उपनिरीक्षक झाला. सध्या तो नांदेड पोलीस दलात नेमणुकीस आहे. तो पुण्यात असताना संबंधित महिलेशी त्याची ओळख झाली होती. त्यावर त्याने लग्न करायचे असल्याचे सांगत जवळीक वाढवली. यावेळी फिर्यादी यांनी त्याला नकार देत मुलगा असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने “मुलाची जबाबदारी घेतो,’ असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांनी लग्नासाठी विचारले असता, त्याने नोव्हेंबरमध्ये नांदेड येथे साखरपुडा केला. पण, नंतर लग्नाला नकार दिला.

 

मात्र, “मी लग्न तुझ्याशीच करणार आहे,’ असे सांगत विश्वास संपादन करून त्याने “बहिणीच्या लग्नाला कर्ज घेतले होते. त्यासाठी पैशांची आवश्यकता आहे,’ असे सांगून 5 लाख रुपये फिर्यादीकडून घेतले. नंतर घराचे बांधकाम सुरू करायचे असल्याचे सांगत 9 तोळे दागिने घेतले. ते परत न करता तसेच लग्न न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या अर्जाची चौकशी केली करुन त्याच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.