नवी दिल्ली – जंतर मंतरवरील प्रक्षोभक घाषणाबाजीबद्दल आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये भाजपच्या अश्विनी उपाध्याय यांचाही समावेश आहे. उपाध्या यांच्या व्यतिरिक्त विनोद शर्मा, दीपक सिंग, विनित क्रांती, प्रीत सिंग आणि दीपक यांचा इतर अटक केलेल्या व्यक्तींमध्ये समावेश आहे.
परवा झालेल्या या घोषणाबाजीनंतर काल संध्याकाळी पोलिसांनी या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. वसाहतींचे कायद्यंच्या निषेधार्थ आणि समान कायद्यांच्या मागणीसाठी उपाध्याय यांनी 8 ऑगस्टला जंतर मंतरवर निषेध मोर्चा काढला होता. या मार्च्यानंतर काही जणांनी काही प्रक्षोभक घोषणाबाजी केली होती. मात्र जांव्हा ही घोषणाबाजी झाली तेंव्हा उपाध्या त्या ठिकाणी उपस्थित नव्हते असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
काल या प्रकरणी काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई केली जाईल आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
जंतर मंतरवर एकत्र आलेल्या लोकांकडे त्याबाबतची कोणतीही परवानगी नव्हती, असे पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी सांगितले.