Nirmala Sitharaman । मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत हा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ उत्कृष्ट आहे. भारताची चलनवाढ स्थिर आहे, जी 4% च्या लक्ष्याच्या दिशेने असल्याचे म्हटले.
रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर सतत लक्ष केंद्रित Nirmala Sitharaman ।
पुढे बोलताना त्यांनी “गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जात” असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर सतत लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. ऐतिहासिक तिसऱ्यांदा त्यांची पुन्हा निवड झाली आहे.
महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद Nirmala Sitharaman ।
दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जातील.
देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाईल. विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी क्षेत्र आणि हैदराबाद-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील ओरवाकल क्षेत्राच्या विकासासाठी निधी दिला जाईल.