राज्यांना आत्तापर्यंत 25.87 कोटी डोस प्रदान

नवी दिल्ली – देशातील विविध राज्यांना आत्तापर्यंत केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारांच्या थेट खरेदी योजनेतून कोविडचे 25 कोटी 87 लाख डोस देण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून आज देण्यात आली.

अजून राज्यांकडे सध्या 1 कोटी 12 लाख 41 हजार डोस शिल्लक आहेत असेही या मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. येत्या तीन दिवसांमध्ये सर्व राज्ये आणि केंद्र सरकारांना आणखी 10 कोटी 81 लाख 300 डोस देण्यात येणार आहेत अशी ग्वाहीही सरकारने दिली आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या डोसविषयी दैनंदिन स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून दिली जाते. आता देशातील सर्व राज्यांना केंद्र सरकारतर्फे येत्या 21 जानेवारीपासून मोफत डोस दिले जाणार असून त्याच्या डिलीव्हरीची माहितीही राज्यांना आगाऊ स्वरूपात दिली जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.