वाघोलीत जास्तीत-जास्त लस उपलब्ध करून द्या

राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांचे  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली (तालुका हवेली) या गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात या गावासाठी जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी  जास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाघोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र अमृतराव सातव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या कोविड-19 प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लसीकरण हा एकमेव पर्याय  आहे. लसीकरणाच्या द्वारे नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे काळाची गरज आहे. तातडीने या लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी व जास्तीत जास्त लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांना लसीकरण करून कोविड-19 मुक्त होण्यासाठी ची मोहीम यशस्वी करण्यासाठी वाघोली गावचे माजी माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्याची व या लसीकरणासाठी वाघोली मध्ये जास्तीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करून  लसीकरण मोहीम अधिक प्रभावी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे  केली आहे.

याबाबत राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले की,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील सगळ्यात जास्त लोकसंख्येच्या गावाला जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देण्यासाठी सध्या पाठपुरावा सुरू असून प्रशासनाकडून या कामी योग्य ते सहकार्य होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.