अभिमानास्पद! सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार

भारताला पहिल्यांदाच मिळाला सन्मान

सोलापूर (प्रतिनिधी) – युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर करण्यात आला आहे. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. या पुरस्कारासाठी तब्बल 7 कोटी रुपयांचे मानधन रक्‍कम देण्यात येणार आहे.जगभरातील सुमारे 140 देशांतील 12 हजारांहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची निवड करण्यात आली आहे.

क्‍यू आर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचे नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आहे. या पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले आहे.

यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करिता वापरणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.