पुणे : अनियमित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ महापालिकेत मनसे, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पाणी पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश हांडे , शिवसेनेचे परेश खांडके, काँग्रेसचे ऋषीकेश बालगुडे यांनी हे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी डोक्यावर हांडे घेऊन पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली. तसेच दुरुस्तीच्या नावाखाली पुणेकारांवर कपात लादू नये अशी मागणी केली.