बगदाद – चलनाच्या अवमूल्यनाच्या निषेधार्थ इराकमधील नागरिकांनी बुधवारी इराकमधील सेंट्रल बॅंकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. इराकचे अधिकृत चलन असलेल्या दिनारचे अवमूल्यन रोखण्यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बॅंकांमधील भ्रष्टाचाऱ्यांना राजकीय नेत्यांकडूनच वाचवले जात असल्याचा आरोप यावेळी निदर्शकांकडून केला गेला.
दिनारच्या अवमूल्यनाच्या कारणावरून सेंट्रल बॅंकेच्या गव्हर्नर मुस्तफा घालेब मुखीफ यांनी सोमवारीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा स्विकारला असल्याचे पंतप्रधान मोहम्मद शला अल सुदानी यांनी जाहीर देखील केले आहे. त्यापूर्वी इराकी दिनारचे आठवड्याभरापासून अवमूल्यन सुरू होते.
कठोर संदेश देण्यासाठी चीनवर बहिष्कार टाकावा – मुख्यमंत्री केजरीवाल
गेल्या शुक्रवारी इराकी दिनारने नव्याने नीचांकी पातळी गाठली. दिनारचे मूल्य प्रति डॉलर 1,670 पर्यंत घसरले आहे. नोव्हेंबर महिन्यापासून दिनारच्या मूल्यामध्ये 7 टक्क्यांनी घट झाली आहे. बुधवारी दिनारचा दर प्रति डॉलर 1,470 इतका होता. अमेरिकेत करण्यात आलेल्या आर्थिक उपाययोजनांमुळे दिनारचे अवमूल्यन झाल्याची टीका काही राजकीय नेत्यांकडून करण्यात येते आहे.