‘राजगृहा’वरील हल्ल्याच्या निषेधार्थ करमाळा येथे राज्य सरकार विरोधात निदर्शने !

घाटकोपर रमाबाई नगर हत्याकांडाचा स्मृतीदिन असल्याने शहिद भिमसैनिकांना वाहिली श्रद्धांजली

करमाळा :  वाढत्या दलित अत्याचाराप्रकरणी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृह’ या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ करमाळा तहसील कचेरी येथे राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी सूरवातीला घाटकोपर रमाबाई नगर हत्याकांडाचा स्मृतीदिन असल्याने शहिद भिमसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदास आठवले यांच्या आदेशानूसार व प महा उपाध्यक्ष नागेशदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास राष्ट्रद्रोहाचा गून्हा दाखल झाला पाहिजे असा कायदा संसदेत पारित करण्यात यावा. तसेच, महाविकासआघाडी सरकार च्या काळात दलितांवरिल अत्याचार वाढले असून कायद्याचा धाक राहीला नाही, सरकार ने योग्य ती दखल न घेतल्यास यापेक्षाहि तीव्र आंदोलन रिपाईतर्फे छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.

याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी मास्क, सॅनिटायझर  यांचा वापर करून  तसेच सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत आंदोलन यशस्वी केले. या आंदोलनास रिपाई(आ) तालूका व शहर तसेच यूवा आघाडी चे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.