केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानी निदर्शने

चंद्रकांत पाटील पूजाअर्चा मध्ये मग्न - अँड.कल्याणी माणगावे

Madhuvan

कोल्हापूर : पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. 6 महिने झाले या पॅकेजची एक दमडीही मिळालेली नाही. नेमकं या पॅकेजचं मोदी सरकारनं काय केलं? याचा जाब जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर व भाजपा नेते धनंजय महाडीक यांच्या कार्यालयासमोर मुक आंदोलनाच्या माध्यमातून विचारला . यापुढेही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आम्ही भाजपाच्या पदाधिका-यांना जाब विचारणार असल्याचा इशारा युवक कॉग्रेसच्या पदाधिका-यांनी दिला आहे.

कोरोना महामारीच्या काळात देशभरातील उद्योग धंदे बंद पडले, शेकडो तरुणांचा रोजगार गेला, जनता वैफल्यग्रस्त बनली. रोजी – रोटीचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत जनतेतून केंद्राकडं मदतीची मागणी होवू लागली. जनतेचा वाढता रोष लक्षा घेवून मोदी सरकारनं अत्मनिर्भर या गोंडस नावाखाली स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहिर केले. पाच महिने झाले अद्याप मोदी सरकारचं पॅकेजमधील एक दमडी सुध्दा जनतेच्या हाती पडलेली नाही. मोदी सरकारनं घोषणा केलेल्या या २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज नेमकं कुठं गेलयं. असा प्रश्न आता सर्व सामान्य जनतेला पडू लागालयं.

मोदी सरकारचं हे पॅकेज नेमकं जनतेपर्यंत पोहचल की नाही याची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहानीशा केली. परंतु हे पॅकेज सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचले नसल्याच दिसून आले आहे. ऐवढा मोठा निधी नेमका गेला कुठे,. निधी कधी मिळणार यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर भाजपा पदाधिका-यांच्या निवास्थानासमोर, कार्यालयासमोर २० लाख कोटी गेले कुठे असे फलक झळकावत मुकं आंदोलन केली.

कोल्हापुरातही इंद्रजित साळोखे, कल्याणी माणगावे, ऋषीकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानासामोर मुक आंदोलनं केले. मोदी सरकारचं 20 लाख कोटी गेले कुठं असे फलक झळकावत भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांना युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारलाय.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी निदर्शनास सामोरे जाऊन आंदोनल कर्त्याच्या भावना समजवून घेण्यापेक्षा घरी देवघरात पूजा करण्यात मग्न राहिले. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून मोदी सरकाच्या २० लाख कोटी रुपयाचं काय केले? याचे उत्तर कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. परंतु याचं उत्तर कार्यकर्त्यांना मिळाल नसल्यानं.इथून पुढे भाजपाच्या प्रत्येक पदाधिका-यांला आम्ही हा जाब विचारुण आमची मागणी केंद्र सरकारकडं पोहचणार असल्याचं युवक कॉग्रेसच्या कल्याणी माणगावे यांनी सांगितले .

या मुक आंदोलनात जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, उपाध्यक्ष बयाजी शेळके दिपक थोरात, उदय पोवार, विनायक पाटील, योगेश कांबळे, लखन भोगम, संजय सरदेसाई, संभाजी पाटील, आनंदा करपे, सनी सावंत, अनिल कांबळे सहभागी झाले होते.

20 लाख कोटीच्या पॅकेजवरून सतेज पाटील – धनंजय महाडिक यांचे कार्यकर्ते आमनेसामने

सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. त्याचवेळी भाजपाचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती लक्षात घेऊन आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनल होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.