आंदोलनाची सुरुवात विविध क्रांतिगीतांनी व घोषणांनी
सिध्दार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे चौकात निदर्शने
नगर (प्रतिनिधी) –नगर शहरातील सिद्धार्थनगर,अण्णाभाऊ साठे चौक येथे नौजवान भारत सभेच्या वतीने सीएए, एनआरसी, एनपीआर या विभाजनकारी/ गरीब विरोधी कायद्याबाबत विरोधात निदर्शन करण्यात आले.
यावेळी सिद्धार्थ नगर परिसरातील नागरिक व विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.या आंदोलनाची सुरुवात अमन के महम रखवाले सब एक है, एक है!क्रांतिगीतांनी करण्यात आली. मतानाशाह आ कर जायेंगे,हम कागज नही दिखायेंगे, एनपीआर, एनआरसी,सीएए नही चलेगा! नही चलेगा! मजाती धर्म मे नही बटेंगे, मिलकर संघर्ष करेंगे! या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यावेळी नवजवान भारत सभेचे कॉम्रेड प्रवीण, अपेक्षा साळवे, अविनाश साठे, अतुल महारनवर, अमोल दिघे, सरफराज राठोड रोहिणी वाघमारे हर्षदा वाघमारे अक्षय दिवटे बापू घोरपडे इ. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (ठथझख)चे कॉम्रेड संदीप सकट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड मेहबूब सय्यद, रहमत सुलतान फाउंडेशनचे युनूस तांबटकर,पीस फौंडेशनचे आर्किटेक्ट अर्शद शेख व इतर पदाधिकारी नईम सरदार, अमीर बेग, राजेश पवार, अमजद हाजी साहब, फिरोज, शेख, अफजल सय्यद, शहनवाज हुसैन कार्यकर्ते उपस्थित होते.