कोपरगावात मविआचे काळा मास्क घालन निषेध आंदोलन

कोपरगाव – बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कोपरगावात मविआचे वतीने काळया फिती व मास्क घालून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
बदलापूर घटनेवरून सरकारची कोंडी करण्यासाठी बंदला मज्जाव केल्यानंतर राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केला. या निर्णयानंतर कोपरगावमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी सकाळी अकरा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक या ठिकाणी काळया फिती व मास्क बांधून मूक निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांच्या हातात विविध घोषणा देणारे फलक होते.महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. यावेळी इयत्ता सातवीच्या बारा वर्षाच्या राजेश्वरी संतोष होने या मुलीने ‘आज शिवाजी महाराज असते तर” या काव्यपंक्ती सादर करून विरोधकांवर हल्लाबोल केला.
सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून तत्काळ फाशी द्यावी.तसेच बदलापूर येथील जनआंदोलन प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे, त्वरीत कारवाईचे आदेश देऊन महाराष्ट्रातील जनतेस दिलासा द्यावा, या मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे, कैलास जाधव, संजय सातभाई, योगेश बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते संदीप वर्पे, शहराध्यक्ष स्वप्निल पवार, भावेश थोरात, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव नितीन शिंदे, शहराध्यक्ष तुषार पोटे, मनसेचे अनिल गायकवाड, योगेश गंगवाल यासह प्रमोद लबडे, सनी वाघ, कलविंदरसिंग दडियाल, कालूआप्पा आव्हाड, भरत मोरे, रवी कथले, प्रवीण शिंदे, सपना मोरे, राखी विसपुते, वर्षा शिंगाडे, अश्विनी होने, शीतल चव्हाण, इरफान शेख, प्रकाश शेळके, राहुल देशपांडे, बाळासाहेब साळुंके, राजू शेख, अतिश बोरुडे, अशिष निकुंब, सिद्धार्थ शेळके, विजय जाधव आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.





