जवळार्जुन -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ पांडेश्वर (ता. पुरंदर) येथे पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने घोषणाबाजी करीत आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याची माफी न मागितल्यास त्यांना पुरंदर तालुक्यात फिरू दिले जाणार नाही. त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव पाटील यांनी दिला आहे. ज्येष्ठ नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे व्हावे, अशी संतप्त प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी सरपंच कल्पना रोमन, माजी सरपंच संजय जगताप, पंढरीनाथ सोनवणे, प्रताप रासकर, उपसरपंच अनिल शेंडगे, संपतराव साळवी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.