निसर्गाचे संरक्षण करण्याची सर्व लोकांची सामुहिक जबाबदारी- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरणीय असमतोलतेसाठी निसर्गाच्या विरोधातील मार्ग निवडण्याच्या मानवी प्रवृत्तीवर आक्षेप घेतला. तसेच त्यांनी मानवजातीच्या फायद्यासाठी निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी लोकांना आवाहन केले.

नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या रेडिओ भाषणात बोलत होते. ते म्हणाले, यावर्षी भारतात काही भागात अतिपाऊस झाला तर काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस न आल्यामुळे पावसाला दोष देणे चुकीचे आहे. माणसाने निसर्गाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व लोकांची निसर्गाचे संरक्षण करण्याची सामुहिक जबाबदारी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मोदींनी गणेश उत्सवासाठी पर्यावरणपूरक सामुग्री वापरण्यासाठी लोकांना आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)