कचरा प्रक्रिया प्रकल्पांना सुरक्षा द्या

पुणे पालिका आयुक्तांचे पोलिसांना पत्र; बंदोबस्त वाढवण्याच्या ठेकेदारांनाही सूचना

पुणे – आंबेगाव येथील घटनेनंतर सतर्क झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व कचरा प्रक्रिया प्रकल्पांना सुरक्षा देण्यासाठी पाऊल उचलले आहे.

प्रकल्प परिसरात आंदोलन अथवा विरोधाच्या बैठका झाल्यास त्यावर लक्ष ठेवावे, संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले. या शिवाय सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी महापालिकेचे सुरक्षा रक्षक नेमणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुक्त म्हणाले, “प्रकल्पामध्ये आग लावणे, तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस कारवाई करत आहेत.

शहरात विविध ठिकाणी असलेल्या प्रक्रिया प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदारांनीही सीसीटीव्हींसोबत सुरक्षा रक्षक तैनात करावेत. प्रसंगी पालिकेचीही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्तांनाही पत्र दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.