मुंबई – मुंबईतील एका पॉश हॉटेलात वेश्याव्यवसाय चालवणारे एक रॅकेट पोलिसांनी उघडकीला आणले आहे. या प्रकरणी काल कारवाई करून तेथील आठ मॉडेल्सची सुटका करण्यात आली. त्यांना जबरदस्तीने हा व्यवसाय करण्यास भाग पाडले गेले होते.
या रॅकेटच्या संबंधात पोलिसांना गुप्तचर सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जुहु बिचवरील हॉटेलवर छापा टाकला.
याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हेच लोक या मॉडेल्सना वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव आणत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्या हॉटेलमध्ये हा सारा प्रकार चालला होता ते एक नामांकित हॉटेल आहे.
त्यामुळे त्या परिसरात खळबळ माजली आहे. हे रॅकेट चालवणाऱ्यांकडून जुहू भागातील अशाच प्रकारच्या अन्य रॅकेट्सचीही माहिती मिळू शकेल, असा कयास व्यक्त केला जात आहे.