पिंपरी – स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या स्पा सेंटरचा व्यवस्थापक रणवीर रामनरेश राठोड (वय 31 रा. फ्लॅट नं. 104, तनिश आर्कीड, फेज-2, चऱ्होली) आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कस्पटेवस्ती येथील एका इमारतीत स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.18) दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.