लखनौ – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची बदनामी केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेले मुक्त पत्रकार प्रशांत कनोजीया यांची आज सुटका करण्यात आली. काल पत्रकार प्रशांत कनोजीया यांची सुटका करण्याचा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने, ‘स्वातंत्र्याच्या हक्कावर कोणीही गदा आणू शकत नाही’ असा स्पष्ट निर्वाळा केला होता.
अशातच आज उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत मुक्त पत्रकार प्रशांत कनोजिया यांची सुटका केली आहे.
का झाली होती अटक?
एका महिलेने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. त्या संबंधात ही महिला पत्रकारांशी जे काही बोलली त्याचा व्हिडीओ कनोजीया यांनी सोशल मिडीयावर शेअर केला त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.
न्यायालयाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाच्या न्या इंदिरा बॅनर्जी, आणि न्या अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने काल त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना कनोजीया यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. तथापी आम्ही कनोजीया यांना जामीन मंजुर केला असला तरी संबंधीत पत्रकाराने सोशल मिडीयावर जी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही असेही कोर्टाने नमूद केले होते.
Lucknow: Freelance journalist Prashant Kanojia who was arrested by UP Police for an allegedly "defamatory tweet on UP CM" released from jail, after yesterday's SC order. pic.twitter.com/beJsQ31sRQ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 12, 2019