“ब्रेक्‍सिट’ला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मान्य 

लंडन – “ब्रेक्‍झिट’च्या प्रक्रियेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी युरोपियन संघाला केलेल्या विनंतीला ब्रिटनच्या संसदेने दुजोरा दिला आहे. मंगळवारी संसदेत या प्रस्तावासंदर्भातील मतदानात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षातील बहुसंख्य खासदारांनी आणि विरोधी मजूर पक्षाच्या खासदारांनीही थेरेसा मे यांच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.

एकूण 410 विरुद्ध 110 मतांच्या फरकाने “ब्रेक्‍झिट’ला मुदतवाढ मागण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. ब्रिटनने युरोपिय संघातून तातडीने बाहेर पडावे या मागणीसाठी हुजूर पक्षातील काही प्रमुख खासदारांच्या गटाने थेरेसा मे यांच्या या प्रस्तावाला विरोध केला. कोणत्याही तडजोडीशिवाय ब्रिटनने युरोपिय संघातून बाहेर पडावे, अशी या खासदारांची मागणी आहे. मात्र बहुसंख्य खासदारांनी मुदतवाढीला अनुकूलता दर्शवली.

“ब्रेक्‍झिट’साठी नवीन पर्याय मांडायला अवधी मिळायला हवा यासाठी थेरेसा मे यांनी युरोपिय संघातील अनेक देशांशी संपर्क साधून अनुकूल मत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जर्मनीतील बर्लिनपासून फ्रान्समधील पॅरिसपर्यंत त्यांनी आपले संपर्काचे वर्तुळ वाढवले. नियोजित मुदतीत “ब्रेक्‍झिट’चा निर्णय होऊ शकणार नाही, हे निश्‍चित झाल्यावर थेरेसा मे यांनी कोणत्याही ठरावाशिवाय “ब्रेक्‍झिट’ऐवजी “ब्रेक्‍झिट’साठी अधिक मुदतवाढ मागितली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.