भोपाल – मध्यप्रदेशातील जबलपूरमधील आरटीओ अधिकाऱ्याचे घर आहे की राजाचा वाडा? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. कारण बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी जबलपूर आरटीओ संतोष पाल सिंग यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा सर्वांचेच डोळे उघडले.
या संतोष पाल सिंग यांच्या घरातून उत्पन्नापेक्षा ६५० पट जास्त किमतीची मालमत्ता मिळल्याचे बोलले जात आहे. तपासात जबलपूरच्या आरटीओकडे 16 लाखांची रोकड आढळून आली.
ड्राइग रुमपासून बाथरूमपर्यंत… सर्वत्र काळ्या पैशाचे दर्शन घडते. साहेबांनी तर घरात स्वतःचे खाजगी थियेटर बांधले आहे. काळ्या पैशाने थिएटरमध्ये रेड सीट बसवण्यात आल्या आहेत. छापेमारीदरम्यान आरटीओ संतोष पाल सिंह यांची अनेक घरे – अनेक वाहने आणि इतर कागदपत्रे सापडली आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
आर्थिक गुन्हे कक्षाच्या (EOW) पथकाने बुधवारी रात्री बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) संतोष पाल यांच्या घरावर छापा टाकला. या छापेमारीवेळी घरातून 16 लाखांच्या रोख रकमेसह काळ्या पैशातून मिळवलेल्या अमाप मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत.
प्राथमिक तपासात उघड झालेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की,’सेवेच्या कालावधीत आरटीओच्या वैध स्रोतांमधून मिळालेला खर्च आणि मिळविलेली मालमत्ता 650 टक्के आहे.
शताब्दीपुरम कॉलनीतील त्याच्या आलिशान घरावर ईओडब्ल्यूच्या पथकाने कारवाई केली. यादरम्यान त्याच्या नावावर अर्धा डझन घरे आणि फार्महाऊससह आलिशान गाड्या तसेच १६ लाख, तसेच लाखांचे दागिने असल्याची माहिती टीमला मिळाली आहे.
EOW SP देवेंद्र प्रताप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ‘RTO अधिकारी संतोष पाल आणि त्यांची लिपिक पत्नी रेखा पाल यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्याची पडताळणी निरीक्षक स्वर्णजीत सिंह धामी यांनी केली होती. रात्री उशिरापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की आरटीओ संतोष पाल यांच्या सेवा कालावधीत वैध स्त्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांचा खर्च आणि संपादित मालमत्ता 650 टक्के आहे.’
ईओडब्ल्यूला आरटीओच्या पीपी कॉलनी ग्वारीघाट येथील १२४७ चौरस फुटांच्या घराची कागदपत्रे तपासादरम्यान सापडली आहेत. त्याचप्रमाणे शंकर शाह वॉर्डात 1150 चौरस फूट, शताब्दीपुरम (एमआरफोर रोड) येथे 10 हजार स्क्वेअर फूटच्या दोन निवासी इमारती, कस्तुरबा गांधी वॉर्डमध्ये 570 स्क्वेअर फूट आणि गडफाटक येथे 771 स्क्वेअर फूट घर याशिवाय चारागा रोड गावातील 1.4 एकर जमीन आहे. त्यावर बांधलेल्या फार्म हाऊसचीही माहिती मिळाली आहे.
तपासादरम्यान आरटीओने खरेदी केलेल्या I-20 कार (नंबर MP 20 CB 5455), स्कॉर्पिओ (नंबर MP 20 HA 8653), पल्सर बाईक (नंबर MP 20 NF 2888) आणि बुलेट (नंबर MP 20 MSZ 5455) ची कागदपत्रेही तपासात समोर आली आहेत.