प्रॉपर्टीची खरेदी करताना …

ब्रोकरशिवाय व्यवहार केले तर त्याच्या फिसचे पैसे वाचतात. जर आपण पैसा वाचवू इच्छित असाल तर थेटपणे मालमत्ता विक्री करणाऱ्या मालकाशी संपर्क साधावा. वृत्तपत्रातून दिल्या जाणाऱ्या जाहिरातीवर लक्ष दिल्यास आपण मालकाशी व्यवहार करू शकतो. यातून व्यवहारासाठी एजंटला द्यावा लागणारे एक ते दीड टक्के कमिशन वाचते.

घर खरेदीच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला दक्ष राहावे लागते. घर खरेदीसाठी आपण एखादी जागा, एरिया निश्चित केला असेल तर त्या भागातील जमिनीचे, घराच्या भावाची चांगल्या रितीने पडताळणी करणे गरजेचे आहे. आपल्या आवडीच्या घराची किंमत निश्चित करताना वाटाघाटी करण्यास जराही मागेपुढे पाहू नये. तसे पाहिले तर साधारणपणे विक्रेता हा घराची किंमत प्रचलित किमतीच्या तुलनेत अधिक सांगत असतात. शेवटी आपल्या मेहनतीच्या पैशातून घर खरेदी करताना आपण अधिक किंमत का मोजावी, असाही एक प्रश्नह उपस्थित होतो. उदा. फळवाला देखील फळाचे भाव जास्त आकारूनच विकत असतो. आपण आहे त्या भावाला खरेदी करणे म्हणजे नुकसान करून घेण्यासारखे आहे. हाच फंडा घर खरेदीलाही लागू होतो. चर्चेने आणि चांगल्या युक्तिवादाने आपण वाजवी किमतीत घर पदरात पाडून घेऊ शकतो. म्हणूनच घर, मालमत्ता खरेदी करताना आपण काही पथ्य पाळायला हवीत.

आकर्षक सवलतींचा विचार करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बहुतांश बिल्डर हे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलतीचा वर्षाव करत असतात. त्यात महागड्या गाड्या, फ्री क्लब मेंबरशिप यांचा समावेश असतो. अशा आकर्षक भेटीच्या जाळ्यात काही ग्राहक अडकतात. तसे पाहिले तर मोफत वस्तूंच्या किमतीचा समावेश हा घराच्या किमतीत केलेला असतो, हे सर्वांनाच ठाऊक असते. तरीही बिल्डरच्या बोलण्यास भरीस पडून आपण घासाघीस न करता घर खरेदी निश्चित करतो. मात्र, वास्तविक मालमत्तेवर आकारलेल्या किमतीत वाटाघाटी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातून बराच पैसा आपला वाचू शकतो.

या गोष्टीकडे लक्ष द्या

जर आपण घर खरेदी करण्यासाठी एखाद्या विशिष्ट भागाची निवड केली असेल तर त्या भागात किती किमतीला घराची खरेदी करावी, याचा विचार करायला हवा. घर विकणारा मनमानीप्रमाणे किंमत आकारेल आणि आपणही त्या किंमतीला घर खरेदी करू, असे तर घडत नाही. विकणारा हा जादा भावानेच वस्तूची विक्री करत असतो. मात्र, आपण त्यात घासाघीस किंवा तडजोड करू शकतो. अर्थात विक्रेत्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा आपण खूपच कमी किंमत देत असू तर विक्रेता आपल्याकडे लक्ष देणार नाही आणि तो अन्य खरेदीदाराकडे वळू शकतो. घराची योग्य किंमत ओळखणे हे अत्यंत हुशारीचे काम आहे.

संपूर्ण पडताळणी करा

घराची किंमत ठरवण्यापूर्वी आपण अगोदर त्या भागाचा अभ्यास करा. तेथील घराच्या किमतीचे आकलन करा. घराची जागा, सुविधा आदी कारणावरून घराची किंमत कमी जास्त होत असते. परिसरातील घराच्या किमतीपेक्षा जादा किमतीत घर विकण्याचा विक्रेता प्रयत्न करत असतो. त्याचवेळी दलाल आणि विक्रेत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका. परिसरात अलीकडच्या काळात खरेदी-विक्री केलेल्या मालमत्तेचा आढावा घ्या. अनेकदा प्रॉपर्टी एजंट हे अधिक कमिशन मिळावे यासाठी जाणीवपूर्वक घराच्या किमती वाढवतात. या कारणामुळे काहीजण दलालाच्या हस्तक्षेपाविना घर विकतात आणि खरेदी करतात. ब्रोकरशिवाय व्यवहार केले तर त्याच्या फिसचे पैसे वाचतात. जर आपण पैसा वाचवू इच्छित असाल तर थेटपणे मालमत्ता विक्री करणाऱ्या मालकाशी संपर्क साधावा. वृत्तपत्रातून दिल्या जाणाऱ्या जाहिरातीवर लक्ष दिल्यास आपण मालकाशी व्यवहार करू शकतो. यातून व्यवहारासाठी एजंटला द्यावा लागणारे एक ते दीड टक्के कमिशन वाचते.

घर खरेदी करताना आणखी एक बाब लक्षात घ्यावी, ती म्हणजे मालमत्ता बाजारात प्रॉपर्टी किती दिवसांपासून आहे. एखादी मालमत्ता सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बाजारात असेल आणि ती विकली गेली नसेल तर आपण सवलत पदरात पाडून घेऊ शकतो आणि घराची खरेदी वाजवी किमतीत करू शकतो. जर घर गहाण ठेवले असेल तर राहिलेली रक्कम जाणून घेणे गरजेचे आहे. कारण कधी कधी विक्रेता डिफॉल्टर असेल आणि काही हप्ते भरू शकला नसेल तर अशा स्थितीत आपल्याला घासाघीस करण्यास आणखी वाव मिळू शकतो. जर गुंतवणूक म्हणून आपण मालमत्ता खरेदी करत असाल तर त्या घरापासून आपल्याला किती भाडे मिळू शकते, याचा अंदाज घ्यायला हवा. आपल्या घराच्या किमतीच्या सहा टक्के वार्षिक परतावा भाड्याच्या रुपातून मिळणे गरजेचे आहे. जर आपल्याला त्यापेक्षा कमी भाडे मिळत असेल तर घर खरेदी करण्यात अर्थ नाही. म्हणूनच परिसरातील लोकांशी चर्चा करून सध्याच्या भाड्याची स्थिती जाणून घ्यावी. गेल्या काही वर्षातील भाड्याची चढउतार जाणून घेतल्यास घर घ्यावे की नाही, या निष्कर्षाप्रत आपण येऊ शकतो.

बजेटची माहिती अगोदरच द्या

घर खरेदीचे बजेट आपले किती आहे, हे अगोदरच ब्रोकरला सांगणे गरजेचे आहे. अशा स्थितीत ब्रोकर घर विक्री करणाऱ्या मालकाला मानसिकदृष्ट्या किमतीवरून तयार करू शकतो. खरेदीदार हा किती किंमत देऊ शकतो, ही बाब मालकाला कळाली तर तो परवडत असेल तर घरविक्रीचा विचार करतो अन्यथा अन्य ग्राहकाचा शोध घेण्यास मोकळा होतो. ब्रोकर हा खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न करतो; परंतु कधी कधी ब्रोकर हा खरेदीदाराला आपले बजेट वाढवण्यासाठी दबाव आणू शकतो. मात्र, या दबावाला आपण बळी पडू नये. कोणत्याही परिस्थितीत डील मोडू नये, अशीच ब्रोकरची भूमिका असते. जर आपण ब्रोकरमुळे जादा किमतीला घर खरेदीला तयार झालो तर आपणच आर्थिक अडचणीत येऊ शकतो. आपण ठरवलेले बजेट आणि खरेदीची मर्यादा स्पष्ट केल्यास भविष्यात अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. घर खरेदी करण्यासाठी ब्रोकर हा घराबाबतच्या सर्व चांगल्या बाजू सांगू शकतो. त्यावर विश्वाुस ठेवणे जोखमीचे ठरू शकते; परंतु आपण समतोलपणाने घर पाहावे आणि मगच खरेदीचा विचार करावा. खरेदी करताना घराची किंमत दहा टक्के कमीच सांगावी, जेणेकरून ऐनवेळी जर आपल्याला काही किमतीत वाढ करावी लागली तर त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.

लक्षात ठेवा
– भावात घासाघीस ही एका मर्यादेपर्यंत योग्य आहे. वाजवीपेक्षा अधिक घासाघीस किंवा वाटाघाटी करू नये. आपण अधिक घासाघीस केल्यास एखादेवेळी चांगल्या लोकेशनचे घर हातचे जाण्याची शक्यता असते.
– सवलत किंवा भेटवस्तूऐवजी मालमत्तेची एकूण किंमत कमी करण्याचा प्रयत्न करावा.
– उपनगरात किंवा परिसरातील भागातील घराच्या किमतीत घासाघीस करण्यास अधिक वाव असतो.

– मानसी जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)