मोजणी झालेल्या गावांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

जिल्ह्यातील 1 हजार 62 गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी
प्रत्यक्षात मोजणीला लागणार तीन महिने अवधी 

नगर – पुणे-औरंगाबाद जिल्ह्यांबरोबरच नगर जिल्ह्यातील एक हजार 615 ग्रामपंचायतीपैकी 1 हजार 62 गावांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे. ही मोजणी सर्व्हे ऑफ इंडिया द्वारे तीन टप्यात होणार आहे. ग्रामीण भागातील गावठाणांच्या सीमा निश्‍चित करून, गावातील नदी, ओढे, नाल्यांच्या सीमा व रस्त्याच्या जागा निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना सनद, नकाशा, तसेच नागरिकांना प्रॉपोर्टी कार्ड मिळणार आहे. असे भूमि अभिलेख अधीक्षक विष्णू शिंदे यांना सांगितले.

राज्यातील ज्या जिल्ह्यांना नगर भूमापन योजना लागू नसलेल्या सर्व गावांच्या गावठाणांमधील जमीनींचे जीआयएस आधारीत सर्वेक्षण व भूमापन करण्याची भूमी अभिलेख विभागाची योजना आहे. सर्व्हे ऑफ इंडिया मार्फत जिल्ह्यात तीन टप्यात काम होणार असून, दोन टप्पे अद्याप पूर्ण झाले आहेत. आज अखेर पाथर्डी तालुक्‍यात तीसऱ्या ट्‌प्याचे काम सुरु आहे.

गावठाण मोजणी साठी भूमी अभिलेख विभागामार्फत गावठाण हद्दी निश्‍चितीसाठी (ग्राऊंड कंट्रोल पॉईंट) द्वारे संबंधित गावात जाऊन चुना, टाकून हद्द निश्‍चित करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी संबंधित गावांना व गावा लगतच्या नागरिकांना नोटीसा बजावण्याचे काम भूमिअभिलेक विभागामार्फत सुरु असून प्रत्यक्षात ड्रोन द्वारे मोजणी होण्यासाठी आनखी तीन महिने लागणार आहेत. पुणे-औरंगाबाद जिल्ह्यात ड्रोनद्वारे अनेक गावांच्या गावठानांची मोजणी झाली आहे. त्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातील ज्या गावांचा सिटीसर्व्हे झाला नाही. त्या गावांचा सिटीसर्व्हे ड्रोनद्वारे गावठाण हद्दीच्या खुणा दाखविल्या जाणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.