सोशल मीडियावर प्रचाराची राळ

आंबेगाव तालुक्‍यात कार्यकर्त्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मंचर- आंबेगाव तालुक्‍यात सध्या कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीचा सोशल मीडियावर जोरदार प्रचाराची राळ उडवली आहे. उमेदवारांचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रचार करीत असल्याने यंदा कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सर्वच पक्षांसह कार्यकर्ते जोरदार पोस्टरबाजी करुन आपलाच उमेदवार कसा योग्य हे पटवून देत आहेत. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, युट्यूब अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला रंग चढला आहे. सायबर क्राईमच्या वतीने राजकीय पोस्ट टाकून एकमेकांच्या उमेदवारांची नाच्चकी होईल असे विधान करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्यथा, संबंधितांच्या विरोधात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. सोशल मीडियावर प्रचार करताना कार्यकर्त्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. सोशल मीडियाची निर्मिती होण्याअगोदर प्रचार “हायटेक’ होता. घरोघरी जाऊन “ताई, माई, अक्‍का विचार करा पक्‍का’ अशा घोषणा देऊन प्रचार केला जायचा; परंतु, सध्याच्या स्थितीत कार्यकर्ते सोशल मीडियाच्या विविध ग्रुपच्या माध्यमातून आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. सुरुवातीच्या काळात गावोगावी भोंगे लावून गाड्या फिरत असत; परंतु, आता आधुनिक रथ बनविण्यात आले असून, गाण्यांच्या क्‍लिपची निर्मिती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.