पुणे – डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून, मानसिक छळ करत सचिन बबन गलांडे (वय 45, रा. वडगावशेरी) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अनिल बापू कामठे (वय 36, रा. भेकराईनगर) याला अटक केली. याप्रकरणी, संतोष गलांडे (वय 34, वडगावशेरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2018 ते 21 सप्टेंबर 2020 मध्ये घडला.
सचिन गलांडे याने आरोपी अनिल कामठे याच्याकडून दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी हातउसने पैसे घेतले होते. त्या बदल्यात आरोपी कामठे याने फिर्यादीच्या आईच्या नावावरील फुरसुंगी येथील पाच गुंठे जागा सचिन यांची आई किंवा सचिन यांना न सांगता परस्पर आपल्या नावावर करून इतरांना विकून टाकली.
कामठे याने मयत सचिन यांना डोक्यास रिव्हॉल्व्हर लावले, मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.