वेश्‍याव्यवसाय चालणाऱ्या खडकीत हॉटेलवर छापा

रावणगाव – खडकी (ता. दौंड) परिसरातील पुणे सोलापूर महामार्गावरील बब्बी दा रेस्टॉरंट व लॉजिंग या ढाब्याबर शुक्रवारी (दि. 14) रात्री दहाच्या सुमारास धाड टाकून दौंड पोलिसांनी सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दौंड पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली असून एकाला अटक केली असून पिटा ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्‍यातील खडकी येथील पुणे सोलापूर महामार्गावरील येथील ढाब्यावर दोन हजार रुपये देऊन मुली पुरविल्या जात असल्याचा प्रकार सुरु होता. ढाब्याच्या पहिल्या मजल्यावर सेक्‍स रॅकेट सुरु असल्याची माहिती दौंड पोलीस विभागाला मिळाली होती. या प्रकरणी एका बनावट ग्राहकाची भूमिका साकारुन पोलिसांकडून खात्री करण्यात आली होती. सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. यावेळी मुलींकडून स्पाच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. दौंड पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली. तसेच दोन अनोळखी व्यक्‍ती घटनास्थळावरून पळून गेले आहे. दरम्यान, ढाबा व्यवस्थापक आनंद मारुती बोगा (रा. भिवंडी, ठाणे) याला अटक केली आहे. दौंड पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तसेच रेक्‍स रॅकेटमध्ये रोख 6 हजार 200 रुपये जप्त केले असून एक परप्रांतीय तरुणींसह दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. खडकीमध्ये हॉटेल आणि लॉजचे नाव लावून सेक्‍स रॅकेट चालवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, असिफ शेख, निलेश वाकळे यांनी केली.

इतर ठिकाणीही कारवाईची मागणी
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ परिसरात एका खासगी लॉजींगवर व पाटस-दौंड मार्गावरील नानविज फाट्यावरील हॉटेल्सवर मोठ्या प्रमाणात सेक्‍स रॅकेट सुरू असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. पोलिसांनी संबंधित हॉटेल्सवर छापा टाकून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.