भारत-पाक थेट चर्चेला अमेरिकेचे प्रोत्साहन

वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तान यांच्यात आपसातील मतभेदांवर थेट चर्चा व्हावी अशी अमेरिकेची इच्छा असून त्यांना त्यासाठी सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत असे अमेरिकेने म्हटले आहे. पाकिस्तानने भारतातून साखर व कापुस आयात करण्यास अनुमती मागणारा प्रस्ताव फेटाळला आहे त्यावर कोणतीही प्रतिक्रीया देण्यास अमेरिकेने नकार दिला आहे.

अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केले. ते म्हणाले की कोणत्याही मुद्‌द्‌यावर त्या दोन्ही देशात थेट चर्चा होणे हाच एक उत्तम उपाय आहे. असे त्यांनी म्हटले आहे. 

भारताशी व्यापार संबंधी सुरळीत करण्यास पाकिस्तान सरकारने नकार दिला आहे. तो विषय सध्या चर्चेत आहे. भारत जो पर्यंत काश्‍मीरचे कलम 370 पुन्हा प्रस्थापित करीत नाही तो पर्यंत भारतातून कोणत्याही वस्तु आयात केल्या जाणार नाहीत अशी भूमिका पाकिस्तानने मांडली आहे. 

त्यावर अमेरिकेची भूमिका काय असे पत्रकारांनी पुन्हा पुन्हा विचारल्यानंतरहीं त्यांनी त्यावर आपसातील थेट चर्चा होणे आवश्‍यक असल्याचे भाष्य करीत जादा बोलणे टाळले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.