Mrunal Dusanis | ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतील अभिनेत्री मृणाल दुसानिस आता पुन्हा एकदा कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. लग्नानंतर मृणाल अमेरिकेत स्थायिक झाली होती. त्यानंतर ती काही महिन्यांपूर्वीच भारतात परतली आहे. यानंतर आता ती स्टार प्रवाहवरील मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मृणालसोबत यात ज्ञानदा रामतीर्थकर देखील मुख्य भूमिका असणार आहेत.
मृणाल दुसानिसच्या या मालिकेचे नाव ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ असे आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेत दोन बहिणींची कथा पाहायला मिळणार आहे. मृणाल ही ज्ञानदाची मोठी बहीण असल्याचं दिसत आहे. Mrunal Dusanis |
View this post on Instagram
स्टार प्रवाह मालिकेवर १६ डिसेंबरपासून मालिका संध्याकाळी ७ वाजता सुरु होत आहे. मालिकेच्या प्रोमोवर इतर कलाकारांनी कमेंट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, २०१६ मध्ये मृणालने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. मृणाल शेवटची ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेत दिसली होती. २०२० मध्ये या मालिकेने निरोप घेतला होता. यानंतर ती अमेरिकेत गेली. पण आता पती आणि मुलीसह मृणाल पुन्हा भारतात परतली आहे.
मृणालने करिअरच्या सुरुवातीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’,’अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘हे मन बावरे’ या मालिकेनंतर तब्बल तीन वर्षांनी मृणाल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे चाहते देखील तिला पुन्हा एकदा पाहण्यास उत्सुक आहेत.
हेही वाचा: