आश्वासने नकोत, थेट पुरग्रस्तांना मदत पोहचवा; नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची मागणी

इस्लामपूर – सांगली जिल्ह्यावर महापुराचे संकट आहे. वाळवा तालुका व इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील नदीकाठचा भाग पुर्णपणे पाण्याखाली गेला आहे. अनेक नागरीक स्थलांतरीत झाले आहेत. घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता लोकप्रतिनिधींनी गाठी भेटी न घेता पूरग्रस्तांना थेट मदत करावी अशी मागणी उरुण-इस्लामपुर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पूरग्रस्तांच्या वतीने केली आहे. आज शनिवारी पूरग्रस्तांशी भेट देत त्यांनी संवाद साधला.

वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असताना महापुराचे नैसर्गीक संकट भयभीत करणारे आहे.महापुर कोरोना आणि पुन्हां आता महापुर यामुळे नागरीकांचे जनजीवन पुर्णता: विस्कळीत झाले आहे. शासन व प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पुर्ण अपयशी ठरले आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना महापुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिला आहे.

महापुराच्या पाण्याने अनेक घरे व शेतातील पिके पुर्णत: पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या नागरीकांचे मोठ अर्थिक नुकसान झाले आहे. स्थलांतरीत झालेल्या नागरीकांसाठी उरुण-इस्लामपुर नगरपरीषदेने शहरातील अनेक हाॅल मध्ये व्यवस्था केली आहे.

खर्‍या अर्थाने या महापुरात घरांचे व शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकप्रतिनीधी व प्रशाकीय अधिकाऱ्यांनी पुरस्थिती परीसराची फक्त पहाणी न करता व आश्वासन न देता थेट सरसकट पुरग्रस्तांना मदत करावी. मागील महापुरातील मदत आजअखेर ही काही पुरग्रस्त नागरीकांना मदत मिळालेली नाही.

पंचनामे करु, सर्व्हे करु ही पोकळ घोषणाबाजी व आश्वासने नकोत. राजकारण आड न आणता सरसकट मदत जाहीर करुन तात्काळ थेट मदत पोहविणे आवश्यक आहे. मागील महापुरातील मदत अद्याप न पोहचविल्याने व कोरोना संकटात ही अपयशी ठरल्याने या सरकार व लोकप्रतिनिधी वर मोठी नाराजी आहे. यामुळे सरसकट थेट मदत नागरीकांना मिळावी अशी अपेक्षा नागरीकांची आहे. नागरीकांना आता पोकळ आश्वासने नको आहेत. थेट मदत हवी आहे.तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ मदतीचे नियोजन करुन थेट मदत पोहचवावी अशी आग्रही मागणी निशिकांत पाटील यांनी
केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.