Rahul Gandhi – विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील मानहानीच्या खटल्यासाठी उपस्थित राहून लखनौला परतताना एका चर्मकार व्यावसायिकाच्या दुकानाला भेट दिली होती. त्या दुकानदाराला राहुल गांधी यांनी दिल्लीहून बुट शिवण्याचे मशिन पाठवले आहे. ही अचानक मिळालेली भेट पाहून तो चर्मकार व्यावसायिक हरखून गेला आहे.
एक्सवर एक पोस्ट शेअर करताना काँग्रेसने म्हटले आहे की, “लोकनेते राहुल गांधी यांनी काल सुलतानपूर (उत्तर प्रदेश) येथे मोची राम चेत यांची भेट घेतली आणि त्यांच्या कामातील गुंतागुंत समजून घेतली.त्यानंतर त्यांना आता, त्यांना बूट शिलाई मशीन पाठवण्यात आले आहे, ज्यामुळे राम चेतला शूज शिलाई करणे सोपे होईल.
जननायक राहुल गांधी जी कल सुल्तानपुर (UP) में मोची रामचैत जी से मिले थे, उनके काम की बारीकियों को समझा था।
अब उनके लिए जूते सिलने की मशीन भिजवाई है, जिससे रामचैत जी को जूते की सिलाई में आसानी होगी।
ऐसे हैं आपके राहुल, जन-जन के राहुल ❤️ pic.twitter.com/wEQNMneZdB
— Congress (@INCIndia) July 27, 2024
‘ऐसे है आपके राहुल, जन-जन के राहुल.’ असे कॉंग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी थोड्या वेळासाठी मोचीच्या दुकानात थांबले होते. व त्यांनी तेथे चप्पल दुरूस्त करण्याचे काम समजाऊन घेतले होते.
आपके राहुल ♥️ pic.twitter.com/Zl7xQW5ojz
— Congress (@INCIndia) July 28, 2024
तो संदर्भ देत कॉंग्रेसने म्हटले आहे की, आम्ही या कष्टकरी लोकांच्या हक्कांसाठी सतत लढत आहोत, रस्त्यावरून संसदेपर्यंत आवाज उठवत आहोत. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांचे वर्तमान आणि त्यांचे भविष्य समृद्ध,करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर राम चेत मोची यांनी सांगितले की, राहुल गांधींनी चप्पलवर काही शिवणकाम केले आणि त्यांच्या दुकानात चपलाही विकत घेतल्या. मी गेल्या ४० वर्षांपासून येथे काम करत आहे. राहुल गांधींनी आमच्या व्यवसायाबद्दल आमच्याशी चर्चा केली, असे राम चेत यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.