Promise Day : सध्या व्हॅलेंटाईन विक सुरु आहे. या काळात प्रेमळ जोडपे वेगवेगळ्या प्रकारे आपले प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीकमध्ये एक दिवस काही खास दिवस म्हणून साजरा केला जातो. आठवड्याची सुरुवात रोझ डेने होते आणि त्याचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. खरं तर, व्हॅलेंटाईन सप्ताह जोडप्यांसाठी खूप खास असतो. पण, प्रॉमिस डे काही वेगळाच असतो. या दिवशी जोडपे एकमेकांना प्रेमाची शपथ देतात. पण हा दिवस साजरा करण्यामागचे कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घेऊया…
प्रॉमिस डे दरवर्षी 11 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी प्रेमळ जोडपे एकमेकांना अनेक वचने देतात. असं म्हणतात नातं मजबूत होण्यासाठी वचन महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे जोडपे हा दिवस अतिशय खास पद्धतीने साजरा करतात. या खास दिवशी जोडपे त्यांच्या नात्याबद्दल अनेक वचने देतात.
कोणत्याही नात्यासाठी प्रॉमिस डे हा सर्वात खास असतो. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा जोडपी आनंदाने जगण्याची आणि प्रत्येक पावलावर एकत्र राहण्याचे वचन देतात. त्यामुळे हा दिवस साजरा करणे अत्यंत आवश्यक आहे.
जीवनात वचनाला खूप महत्त्व आहे. प्रेम आणि नातेसंबंधांसाठी हे खूप महत्वाचे मानले जाते. नात्यात वाद होणे सामान्य गोष्ट आहे. प्रॉमिस डे ही एक आठवण आहे की तुम्ही प्रत्येक परिस्थितीत एकमेकांच्या पाठीशी उभे राहाल. असे मानले जाते की वचन दिल्याने नात्यातील विश्वास वाढतो आणि नातेसंबंध योग्य मार्गावर राहतात.