संगमनेर – शहरातील उपनगरीय भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे 63 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.3) सकाळी उघडकीस आली. उर्मिला अनिल पावसे (वय 34 रा. श्रमदान सोसायटी, एकता चौक, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील श्रमदान सोसायटी, एकता चौक याठिकाणी रहात असलेल्या उर्मिला पावसे यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने कडीकोंडा व कुलूप तोडून प्रवेश केला आणि सुमारे 63 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घरातून चोरून पसार झाला. घडलेल्या प्रकार लक्षात आल्यावर उर्मिला यांनी सोमवारी रात्री शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.