#Prokabaddi2019 : पुणे तेथे विजयाचे उणेच

मुंबई – क्रीडा प्रकारातील काही व्यावसायिक लीगमध्ये पुणे तेथे विजयाचे उणेच असे चित्र बऱ्याच वेळा पाहावयास मिळते. प्रो कबड्डी लीगमध्ये लागोपाठ दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणला पराभव पत्करावा लागला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या उपस्थितीची प्रेरणा घेत यु मुंबा संघाने त्यांना 33-23 असे हरविले.

या लीगमधील दुसऱ्या टप्प्यास वरळी येथील एनएससीआय क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. मुंबा संघास पुण्याकडून चिवट लढत मिळेल अशी अपेक्षा होती. त्यातही मुंबाचा माजी कर्णधार अनुपकुमारच्या मार्गदर्शनाखाली पुण्याकडून विजयासाठी काही वेगळी रणनीती वापरली जाण्याची अपेक्षा होती. पूर्वार्धात मुंबा संघाकडे 11-9 अशी आघाडी असताना पुण्याचा संघ उत्तरार्धात खेळाचा नूर पालटविणार असे वाटलेही होते. तथापि तसे घडलेच नाही. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच मुंबा संघाने पुण्यावर लोण चढवित 15-10 अशी आघाडी मिळविली. तेथून त्यांनी सतत आघाडी वाढवित पुण्याचे आव्हान फुसकेच ठरविले. प्रत्येकाचा त्यामध्ये वाटा असतो याचा प्रत्यय त्यांनी घडविला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.