बेंगळुरु :- प्रो-कबड्डी लीगमध्ये बरोबरीत सुटत चाललेल्या सामन्यांची संख्या वाढतच आहे. यंदाच्या स्पर्धेतील पाटणा पायरट्स व तमिळ थलैवाज यांच्यातील लढतही गुरुवारी 30-30 अशी बरोबरीत सुटली. या सामन्यात दोन्ही संघानी रेडे व टॅकल गुणांत एकमेकांवर सातत्याने कुरघोडी केली.
यापूर्वी झालेल्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने तेलगु टायटन्सचा 36-35 असा केवळ एका गुणाने पराभव केला. या सामन्यात खरेतर सुरुवातीपासून तेलगु टायटन्सने वर्चस्व राखले होते. मात्र, अखेरच्या सत्रात दिल्लीच्या आक्रमक खेळासमोर ते निरुत्तर झाले.
रेड गुणांमध्ये दिल्लीने 26 तर तेलगु संघाने 25 गुण मिळवले. टॅकल गुणांमध्ये तेलगुने 4 तर दिल्लीने 6 गुणांची कमाई केली हीच सामन्याचा निकाल लावणारी ठरली.