पुणे – शहर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. हे आदेश 26 डिसेंबर पर्यंत लागू रहाणार आहेत. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, घोषणाबाजीसही बंदी आहे.
हे आदेश पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) आर. राजा यांनी काढले आहेत. तर बंद लक्षात घेता सर्व पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी रस्त्यावर असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.