पुणे – शहरात 5 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. या कालावधीत शहरात जमावबंदीचे आदेश राहणार आहेत. तसेच आंदोलन, निदर्शनांवर देखील बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारने दि. 30 नोव्हेंबरपर्यंत टाळेबंदी लागू केली आहे.
करोनामुळे शहरात यापूर्वीचे प्रतिबंधात्मक आदेश 5 नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहेत. आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. करोनाचा संसर्ग विचारात घेऊन प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी पुरेशी काळजी घेऊन सर्व व्यवहार पार पाडावेत. अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे.