सर्जिकल स्ट्राईकच्या कमांडरने केला प्रज्ञासिंह यांचा निषेध

नवी दिल्ली – पाकिस्तानवर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या मोहीमेचे कमांडर निवृत्त लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेंमत करकरे यांच्या विषयी विधानाचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या विधानाने मला ठेच पोहचली आहे. देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या कोणत्याही सुरक्षा जवानाच्या निधनाबाबत असे विधान करणे सर्वस्वी गैर आहे.आज एका कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. सर्जिकल स्ट्राईक सारखा विषय राजकारणात ओढला जातो त्याविषयीही त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. ते म्हणाले की राजकारणाच्या विविध पातळ्यांवरून लष्कराने राबवलेल्या मोहीमेविषयी चर्चा केली गेली आणि त्यावर राजकारण केले गेले ही दुर्देवी बाब आहे. ले. जनरल हुडा यांच्या अध्यक्षते खाली कॉंग्रेसने एक समिती नेमून राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर एक व्हिजन डॉक्‍युमेंट तयार केले आहे त्याचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.