मंचर – येथील अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांना ठेवीसाठी कमी व्याज दिले तरी चालेल. तसेच गरीब, गरजू महिलांनी त्याची परतफेड केल्यास संस्थेची योग्य प्रगती होईल. असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले .
मंचर येथील अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्थेची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दीपप्रज्वलन वळसे पाटील, किरणताई वळसे पाटील, सीताबाई बेंडे, पूर्वाताई वळसे पाटील व संचालकांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल वाचन व्यवस्थापक गायत्री वाळेकर यांनी केले.
दहा वर्षांत संस्थेचे खेळते भांडवल 9 कोटी 62 लाख आहे. 7 कोटी 76 लाखांच्या ठेवी, कर्ज वाटप 5 कोटी 70 लाख असून नफा 9 लाख 42 हजार आहे. संचालिका घोडेकर यांनी बचत गट व विविध योजनांची माहिती सभासदांना दिली. अनुसया उन्नती केंद्राच्या संचालिका राजमाला बुट्टे पाटील यांनी सदिच्छा दिल्या. संस्थेच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील म्हणाल्या की, संस्थेची वाटचाल 10 कोटींच्या ठेवीकडे सुरू आहे. संस्था सतत नफ्यात असून ऑडीट वर्ग “अ’ आहे.
खातेदारांकरिता 7 महिन्यांसाठी 7 टक्के हे चांगले व्याजदर संस्थेने दिले आहे. याचा लाभ खातेदारांनी घ्यावा. यावेळी शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पराग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे,
सभापती देवदत्त निकम , अरुणा थोरात, रुपाली जगदाळे, उषा कानडे, ऍड. सुनीता पाटील, राजमाला बुट्टे पाटील, किसन सैद, सुषमा शिंदे, रुपाली झोडगे, ज्योत्स्ना काकडे, गणपतराव इंदोरे, वैशाली बेंडे, ज्योती शेंडे, उज्वला गावडे, सरस्वती शिंदे, सीताबाई चासकर, इंदूूबाई लोहकरे, ज्योती घोडेकर, कायदेशीर सल्लागार नवनाथ निघोट, निलेश शेळके हे उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती निघोट यांनी केले.