संतापजनक ! रुग्णवाहिकेतून न आल्याने कोविड सेंटरचा उपचारास नकार; प्राध्यापक महिलेचा मृत्यू

अहमदाबाद – भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून ऑक्सिजन बेडअभावी अनेकांना प्राण गमवावा लागत आहे. मात्र काही ठिकाणी कोविड सेंटरच्या बेजबाबदारपणामुळं रुग्णांचा जीव जात आहे. गुजरातमधून अशीच एक संतापजनक बातमी समोर आली असून क्षुल्लक कारणावरून कोविड सेंटरने महिलेला उपचारास नकार दिला. उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाला आहे.

कोविड सेंटरमध्ये येण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी महिलेवर उपचारास नकार दिल्याचे समोर आलं. त्यामुळे या प्राध्यापक महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. इंद्राणी बॅनर्जी या गुजरात केंद्रीय विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्सच्या प्रमुख होत्या.

मागील दोन दिवसांपासून बॅनर्जी यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना उपचारासाठी अहमदाबाद कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने त्यांना योग्य रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचं निधन झालं.

इंद्राणी बॅनर्जी यांना शनिवारी खासगी वाहनातून अहमदाबाद पालिकेच्या कोविड रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण  रुग्णालयाने EMRI 108 रुग्णवाहिकेतून आणलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. यानंतर त्यांना पुन्हा गांधीनगरमधील रुग्णालयात आणण्यात आलं. पण तोपर्यंत ऑक्सिजनची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती. अखेरीस त्यांचा मृत्य झाल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.