दिलासादायक! ‘हर्ड इम्यूनिटी’ने करोना थंडावणार; देशात डिसेंबरपर्यंत 70 टक्के लोकांमध्ये ‘अँटीबॉडी’

नवी दिल्ली – देशात करोनाची दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. लसीकरणही मंदावल्याने चिंता वाढली आहे. त्यातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (DST)चे सेक्रेटरी आणि IIT कानपूरचे सीनियर प्रोफेसर डॉ. आशुतोष शर्मा यांनी म्हटलं की, डिसेंबरपर्यंत देशात हर्ड इम्युनिटी तयार होईल. जेणे करून संक्रमणाचं प्रमाण कमी होईल.

डॉ. शर्मा म्हणाले की, डिसेंबरपर्यंत देशात हर्ड इम्यूनिटी तयार होईल. एकूण लोकसंख्येच्या 60 ते 70% लोकांमध्ये  अँटीबॉडी तयार होतील. यामुळे संक्रमणाच्या ट्रान्समिशनचा वेग कमी होईल. तसेच सर्व काही नियोजनबद्ध झाले तर देश लवकरच करोना महामारीवर विजय मिळवेल.

दरम्यान विषाणूचे वेगवेगळे म्यूटेंट येत आहेत. त्यामुळे लसीकरणानंतरही देशातील लोकांना मास्क घालावे लागतील.  दुसऱ्या लाटेचा अंदाज घेता न आल्याने करोनाचं संकट मोठ बनल आहे. आता आपण सर्वांनी भविष्यासाठी सावध राहिले पाहिजे, असा सल्ला डॉ. शर्मा यांनी दिला. तसेच मास्क, सोशल डिस्टेंसिंग, लसीकरणाची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी म्हटलं.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.